औषधी विक्रेत्यांनी आरोग्यसेवा प्रदाता व्हावे – डॉमनिक जॉर्डन Dominique Jordan
‘केमिस्ट अँड ड्रगीस्ट कॉन्क्लेव्ह’मध्ये केले आवाहन
कोविड काळात अनेक देशांतील औषध विक्रेत्यांनी श्वासाशी संबंधित रुग्ण, गंभीर रुग्णांना औषधी विकणे, घरपोच सेवा, स्क्रीनिंग टेस्ट, लसीकरण इतकेच नाही योग्य तो सल्ला देण्याचेही काम केले. काळानुसार औषध विक्रेत्यांच्या भूमिकेत बदल होत असून त्यांनी केवळ व्यावसायिक म्हणून राहण्यापेक्षा आरोग्य सेवाप्रदाता म्हणूनही काम करावे, असे आवाहन इंटरनॅशनल फार्मास्युटीकल फेडरेशन नेदरलँडचे अध्यक्ष डॉ. डॉमनिक जॉर्डन यांनी केले.इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्यावतीने सुरू असलेल्या 72 व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या तिस-या दिवशी ‘कम्युनिटी फार्मासिस्ट सिनारिओ : ग्लोबल टू लोकल’ विषयावर केमिस्ट व ड्रगिस्ट कॉन्क्लेव्ह पार पडली. कान्क्लेव्हला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून तर इंटरनॅशनल फार्मास्युटीकल फेडरेशन नेदरलँडचे अध्यक्ष डॉ. डॉमनिक जॉर्डन सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
डेप्युटी ड्रग्ज कंट्रोलर डॉ. ए. रामकृष्णन, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सचिव अनिल नमंदर, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. पंकज बेक्टर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटीकल टिचर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयोजन समिती सचिव प्रा. मिलिंद उमेकर, विद्यार्थी प्रतिनिधी राहूल लाड, रॉयल फार्मास्युटील सोसायटीचे संस्थापक महेंद्र पटेल यांची उपस्थित होते.
डॉमनिक जॉर्डन यांनी जगभरातील जगात कम्युनिटी फार्मसिस्टच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. भौगोलिक स्थिती, उदारमतवादी धोरण, नवे तंत्रज्ञान, नवीन उपचार पद्धती, वाढती स्पर्धा, वैद्यकीय सेवेची वाढता खर्च अशी अनेक मोठी आव्हाने फार्मा क्षेत्रासमोर आहेत. याशिवाय, सुशिक्षित ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे औषध विक्रेत्यांनादेखील स्वत:ला सर्वदृष्टीने तयार ठेवावे लागणार असून वेळ पडल्यास डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही द्यावा लागणार आहे. वाढती स्पर्धा बघता फार्मासिस्टनी ग्राहकांना या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच उत्तम सेवाही द्यावा लागणार असल्याचे डॉमनिक जॉर्डन यांनी सांगितले.

जगन्नाथ शिंदे म्हणाले, ग्लोबल आणि लोकलमधले अंतर वेगाने कमी होत असून औषधी आणि पैसा हे त्यातले दोन समान घटक आहेत. भारत गॅट फॅमिलीचा सदस्य झाल्यामुळे आता आपली स्पर्धा थेट जागतिक बाजारपेठेशी होणार आहे. त्यामुळे आता अस्तित्वाची लढाई आहे. त्याचा सामना करण्यासाठी शिक्षण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर व उत्तम सेवा देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
भारतात 60 टक्के फामर्सिस्ट या महिला असून त्यांना प्रशिक्षित केले तर त्या ग्राहकांना चांगल्या सेवा देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करताना जगन्नाथ शिंदे यांनी संघटनेतर्फे फार्मासिस्टना अपग्रेड करण्यासाठी कम्युनिटी ट्रेनिंग देण्यात येत असल्याचे सांगितले. सरकारनेही फार्मासिस्टच्या अपग्रेडेशनसाठी काही नियम, धोरणे बदलण्याची गरज प्रतिपादिली. फार्मासिस्टची नवी पिढी व्यवसायात उतरत असून भविष्यात डायबेटीस, हृदयरोग, उच्चरक्तदाब, कर्करोगसाठी स्पेशलाईज्ड फार्मसी उद्यास येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महेंद्र पटेल यांनी ‘अँटीबायोटीक गार्डियन इन इंडिया’ विषयावर आपले विचार मांडले. प्रा. मिलिंद उमेकर यांनी कम्युनिटी फार्मसिस्टसाठी कम्युनिटी ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी घरत यांनी केले.
No comments